किनगाव येथे कुस्तीत महिलेने लावली पुरुषाची पाट...
![किनगाव येथे कुस्तीत महिलेने लावली पुरुषाची पाट...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65acf04422deb.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथे हजरत पीर गैबीबाबा यांच्या उरुस यात्रेनिमित्त; कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि.२० जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वा. अहमदपुर-चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच विठ्ठलराव बोडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हापरिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सुनिल वाहुळे, तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंढे, ग्रामविकास अधिकारी आर. जी. कांबळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्यासह आदीजन उपस्थित होते.
तर नामवंत मल्लांच्या कुस्ती स्पर्धेत सर्वप्रथम येण्याचा मान दिपक मोतीराम कराड रा रामेश्वर लातुर, तर द्वितीय प्रदिप गोरे लातुर, तृतीय पारीतोषीक सुरज शेख बीड व ओम पाटील सोलापुर, या मल्लांना विभागुन देण्यात आला.
तसेच या कुस्ती स्पर्धेत महिला मल्ल मोनिका बिडगर (गंगाखेड) हिने पुरुष मल्ल बालाजी नर्सीकर (मुखेड) यांची पाठ लावून विजय संपादन केला. तर दुसरी महिला मल्ल रुपाली शिंदे ( हिंगोली) हिची कुस्ती पुरुष मल्ल सेवालाल राठोड (धसवाडी ता. अहमदपूर) यांच्यात बरोबरीची कुस्ती सुटली. महिला मल्लांनी पुरुषासोबत रोमांचक कुस्ती धरुन उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. या कुस्तीत महिला मल्लांनी अक्षरशः पुरुषाची पाठ लावली.या कुस्त्या शनिवारी रात्री ८ वाजे प्रयंत चालल्या.