कालिका माता महिला मंडळाच्यावतीने, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन...

कालिका माता महिला मंडळाच्यावतीने, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी

यवतमाळ : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कालिका माता महिला मंडळाच्यावतीने, कालिका संस्थानच्या सभागृहात तीळ संक्रांत निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. घेण्यात आलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाविन्य होते. ते म्हणजे माता शबरीच्या आकर्षण अशा वेशभूषेत सौ. नंदिनी गुंडेवार यांनी समस्त पाटणबोरीच्या महिलांचे मन वेधून घेतले होते. उत्तम प्रकारे त्यांनी शबरी माताची वेशभूषा हुबेहूब साकारली व त्या ज्या झोपडीत कुटीत राहत होत्या त्याची हुबेहूब कुटी तयार करण्यात आली होती.

त्यामुळे वान घेण्याकरिता आलेल्या  सर्वत्र महिलांनी त्यांचे कौतुक करण्यात केले आहे. अनेक महिलांनी शबरी माताची वेश भूषा केलेल्या नंदिनी गुंडेवार यांच्या सोबत फोटो काढण्या गर्दीच केली होती. त्यामुळे महिलांमध्ये गावात चर्चाच विषय बनला होता. तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला अशा या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांनी कार्यक्रमाच्या शेवटी गुलाबी शरारा या गाण्यावर नृत्य करून आनंद घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशा करिता कालिका माता महिला मंडळच्या महिलानी अथक परिश्रम घेतले. सौ. रजनी पुलोजवार, सौ. मनीषा नारलावार, वर्षा गुंडेवार, नंदा भोयर, भारती भागानगरकर,अश्विनी यामसंनवार, वंदना नार्लावार, कविता डब्बावर, नंदिनी गुंडेवार, शिल्पा सिर्तावार, रीना गाहुकार, रक्षा पवार, नम्रता मंदुलवार, शोभा शिर्ता वार, सरोज राजुलवार या महिलांनी अथक परिश्रम घेतले.