आसलगांव येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी.! तथा भुंबरे सरांचा सत्कार...

आसलगांव येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी.! तथा भुंबरे सरांचा सत्कार...

NEWS15 प्रतिनिधी : संतोष कुलथे

बुलढाणा : जळगांव जामोद तालुक्यातील आसलगांव येथे; श्री मारोती संस्थान तर्फे हनुमान जयंती उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार संजयभाऊ कुटे तर उदघाटक स्वामी रामभारती महाराज हे उपस्थित होते. या कार्यक्रमात श्री नारायणराव भुंबरे सर अध्यक्ष श्री मारोती संस्थान यांनी स्व-ईच्छेने संस्थान'च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे, त्यांचा भव्य  सत्कार करण्यात आला. मंचावर प्रमुख अतिथी जि. प. सदस्या सौ. मंजुषाताई तिवारी, उपसरपंच गणेश गिऱ्हे, संगीताताई माहोदे व सुनिताताई तिरुख उपस्थित होते.

सर्व मान्यवर, उपस्थित विश्वस्त मंडळ आणि गावकरी यांनी सरांचा शाल, श्रीफळ व हार देऊन सत्कार केला. मा.आमदार यांनी सरांच्या समाजिक कार्याचा आपल्या भाषणातून गौरव केला; व त्यांचे समाजिक कार्य अमर व इतरांना प्रेरणादायी राहील असे उदगार काढून, सरांना दिर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या. तर स्वामी रामभारती महाराज यांनीही; सरांना दिर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो असा आशिर्वाद दिला व संस्थानच्या  प्रगतीचा इतिहास आपल्या भाषणातून व्यक्त केला. मा. आमदार कुटे व स्वामी रामभारती महाराज यांच्या हस्ते संस्थानने बांधलेल्या नविन दोन खोल्यांचे उदघाटन केले. मा. आमदार कुटे यांनी मंदिरा समोरील पटांगनात पेव्हर्स ब्लॉक बसवून देण्याचे आश्वासन दिले. तर भुंबरे सरांनी संस्थान ला २१,०००/- रु. देणगी जाहीर केली.

भुंबरे सरांनी सत्काराला उत्तर देतांना; विश्वस्त मंडळ, युवामंडळ व गावकरी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले व त्यामुळेच संस्थानची प्रगती झाली व राजाश्रय मिळाला हे सांगितले. या उत्सवात सर्व गावकरी व युवक मोठ्या संख्येने तथा विश्वस्थ मंडळ नंदकिशोर कलंत्री, समाधान बढे, जनार्दन कारोडे व मनोज भारसाकळे उपस्थित होते. सभा संचालन व आभार प्रदर्शन बळीराम भेलके यांनी केले व महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.