सोलापूर जिल्हा परिषदमध्ये होणार, "आंबेडकरी" विचारांचा जागर.! विविध कार्यक्रमातून अभिवादन...
![सोलापूर जिल्हा परिषदमध्ये होणार, "आंबेडकरी" विचारांचा जागर.! विविध कार्यक्रमातून अभिवादन...](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_6437ede14b5f0.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : प्रवीण मखरे
सोलापूर : समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांचेकडून सालाबादप्रमाणे यंदाही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त; दि. 14 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संविधान स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन तदनंतर सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व दिपप्रज्वलानाने होणार आहे. त्यांनतर प्राध्यापक डॉ.प्रभाकर कोळेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विदयापीठ सोलापूर यांचे व्याख्यान, मराठा सेवा संघातर्फे भिमगीते गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे सत्कार तसेच भारताचे संविधान पुस्तिकेचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखन केलेल्या विविध पुस्तकांचे वाटप देखिल करण्यात येणार आहे. तेव्हा सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त अधिकारी व कर्मचा-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अति.मुख्य कार्यकारी संदिप कोहिनकर व जिल्हा समाजकल्याण् अधिकारी सुनिल खमितकर यांनी केले आहे.