खासदार सुधाकर श्रृंगारे यांची किनगाव येथिल "मराठी पत्रकार" संघाच्या कार्यालयास भेट...

खासदार सुधाकर श्रृंगारे यांची किनगाव येथिल "मराठी पत्रकार" संघाच्या कार्यालयास भेट...

NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख

लातूर : अहमदपुर तालुक्यातील किनगाव  येथिल मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयास खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी सदिच्छा भेट दिली. याभेटी दरम्यान खा. सुधाकर श्रृंगारे यांनी पत्रकारांशी सविस्तर संवाद करत; अनेक विषयावर चर्चा केली. तसेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने तटस्थ राहून, सर्वसामान्य जनतेला अडचनीच्या काळात सहकार्य करावे आणि न्याय मिळवून द्यावा असे आवाहन केले. यासह शासन विविध योजना ह्या सर्वसामान्यांसाठी सरकार राबवत असून, त्याची माहिती देऊन त्यांचा गरजूंना त्याचा लाभ मिळवून द्यासाठी प्रयत्न करावा असेही म्हंटले.

या वेळी माजी राज्य मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, अहमदपुर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गोविंद गीरी, किनगाव मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शेटीबा श्रृंगारे तसेच किनगाव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरख भुसाळे, उपाध्यक्ष असलम शेख, सचिव जाकेर कुरैशी, पत्रकार अन्वर बागवान, सामाजिक कार्यकर्ते मनोहर आलट आणि किनगाव येथील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष शिवराज भुसाळे, अखिल पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते.