दिंडोरी परिसरात वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी...
![दिंडोरी परिसरात वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी...](https://news15marathi.com/uploads/images/202306/image_750x_647c6d9a24474.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात वटसावित्री पौर्णिमा हा सण; महिलांनी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला. पती आणि कुटुंबाच्या स्वास्थ सुख-समृद्धीसाठी अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन वटपौर्णिमा निमित्ताने वडाच्या झाडाचे पूजन केले.
दिवसेंदिवस वडाच्या वृक्षांची संख्या कमी होत असल्याने; यावेळी महिलांनी वृक्षारोपण करण्याचा संदेश ही यावेळी दिला. वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून व्रताची सुरुवात केली. त्यानंतर वटवृक्षाची पूजा करत वडाला फुले,वान,पाणी, देत त्याभोवती फेऱ्या घालत एकमेकींना आंबे व हळूकुंकू देत वटपौर्णिमा साजरी केली नवविवाहितांमध्ये यावेळी मोठा उत्साह जाणवत होता. याप्रसंगी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना महिला दिसून आल्या.