पत्रकार गजुभाऊ कैलासवार यांच्या मातोश्री; कै. सविताताई कैलासवार यांचे दुःखद निधन...

पत्रकार गजुभाऊ कैलासवार यांच्या मातोश्री; कै. सविताताई कैलासवार यांचे दुःखद निधन...

यवतमाळ - पाटणबोरी.! येथील आमचे "न्यूज15 मराठी"चे प्रतिनिधी श्री. गजुभाऊ कैलासवार यांच्या मातोश्री (आईसाहेब) कै. सविताताई विठ्ठलराव कैलासवार यांचे 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाने कैलासवार कुटुंबासह "NEWS15 मराठी" परिवारावर दुखा:चा डोंगर कोसळा आहे. 

सायंकाळी 6 वाजता स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले असून, त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, दोन सुना, नातू-नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.

 या दुःखात "NEWS15 मराठी" संपूर्ण परिवार सहभागी असून, ईश्वर या पवित्र दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व कैलासवार कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो... आपला माणूस हरपल्याचे दुःख शब्दात व्यक्त करता येणारे नाही. पण त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील...

भावपूर्ण श्रद्धांजली...