पाटणबोरी येथील कालिका संस्थानच्यावतीने, नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी...
![पाटणबोरी येथील कालिका संस्थानच्यावतीने, नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_6527b94551ba6.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री कालिका माता संस्थानच्यावतीने, दि. 15 ऑक्टोंबर रोजी नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे. श्री कालिका माता संस्थेच्यावतीने स्थानिक महाकाली मंदिर पासून ज्योत घेऊन देवीचा घट स्थापना करण्यात येणार आहे. मुख्य रस्त्याने ढोल ताशाच्या गजरात, बँड व ताशाच्या निनादात, भजन मंडळी पायदळ मिरवणूक काढून कालिका माता मंदिर मध्ये घट स्थापन करण्यात येणार आहे.
सन 2014 - 15 या वर्षी कालिका मातेची मूर्ती ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथून आणून स्थापन करण्यात आली होती. याकरिता तात्कालीन अध्यक्ष स्व. राजू यमसनवार यांनी पुढाकार घेतला होता. कालिका मातेचे परिसरातील एकमेव मंदिर आहे. पूर्वी नवरात्र कालिका मंडळातर्फे दरवर्षी कालिका मातेच्या मूर्तीची स्थापना व्हायची आणि विसर्जन व्हायचे. त्यानंतर मंडळातील सर्व सदस्य एकत्र येऊन मंदिर साकारण्याची कल्पना मांडण्यात आली. त्याला पूर्ण रूप देऊन कालिका मातेच मोठे व भव्य मंदिर पाटणबोरी येथील बालाजी नगरात बांधण्यात आले. तेलंगणा राज्यातील व महाराष्ट्रातील भाविक भंत्त मोठ्या संख्येने केळापुर येथील जगदंबा मातेच्या दर्शन करिता जातांना; कालिका मातेच्या दर्शना करिता अवश्य येत असतात. कालिका संस्थान तर्फे 9 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम घेतल्या जाते. 9 दिवस चालत असलेल्या कार्यक्रमात दांडिया, भजन, जागरणचा कार्यक्रम आयोजित केल्या जाते. पाटणबोरी येथे नवरात्रात कालिका मातेच्या दर्शना करिता तेलंगणातील व महाराष्ट्रातील भक्त गण मोठ्या संख्येने येतात. विशेष म्हणजे कालिका देवीच्या 9 दिवस आरती करिता लक्की ड्रा तिकीट काढून भक्तांची आरती मध्ये निवड करण्यात येते. भक्तांनी लक्की ड्रॉ ची तिकीट काढून ड्रॉ मध्ये सहभाग घ्यावे असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. श्री कालिका माता संस्थानतर्फे अन्नदान व महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आयोजित केल्या जातो.
परिसरातील हजारो भक्तगण या महाप्रसाद लाभ घेतात. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कालिका माता सार्वजनिक संस्थानचे अध्यक्ष अनिल एम पुल्लजवार, उपाध्यक्ष अनिल गुंडेवार, सचिव गिरीश भागानगरकर, कोषाध्यक्ष, सुधीर जंगमवार, सह सचिव रामदास बावणे, विश्वस्त किशोर नार्लावार, विश्वस्त अजय राजुलवार, गोपाल शर्मा आदी परिश्रम घेत आहेत.