भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या पडला विहरीत.! तर बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी...

भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या पडला विहरीत.! तर बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, दिंडोरी

सुरगाणा तालुक्यातील उंबरठा वनपरिक्षेत्रातील काठीपाडा येथील शेतकरी सिताराम दहावाड यांच्या मालकीची विहीर गावालगतच्या शेतात आहे. रात्री १ ते २ च्या दरम्यान भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या विहरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विहीर अगदी गावालगतच असल्याने, रात्रीच्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ गावालगत येत असतात. अंधारात घरातील मांजरे रान उंदराच्या शिकारीसाठी जंगलात जातात. मांजराचा पाठलाग करण्याच्या नादात मांजराने 'चकवा' दिला असावा त्यामुळे बिबट्या विहरीत पडला असेल असा कयास वनविभागाने व्यक्त केला आहे. काही महिला विहरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या असता त्यांच्या  हीबाब लक्षात आल्याने ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला कळविण्यात आले आहे.

विहरीत पाईप असल्याने त्याचा आधार घेऊन रात्रभर बिबट्या विहिरीत होता. सकाळी काही नागरिकांनी लोखंडी विणलेली खाट उलटी बांधून त्यावर बिबट्याला बसायची व्यवस्था केली होती.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर; वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक उमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर तसेच वनरक्षक तुकाराम चौधरी, अरुण मेघा, भटु बागुल, योगेश गांगुर्डे, याशिनाथ बहिरम, भास्कर चव्हाण, वामन पवार, कल्पना पवार, अविनाश छगणे, रामजी कुवर, हिरामण थविल, यमुना बागुल व नाशिक येथील वन्यप्राणी बचाव सहाय्यक पथक आदींनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बछडा असलेल्या बिबट्याला दुपारी बारा वाजेच्या सुमारास विहिरीतून सुरक्षित बाहेर काढून, वनक्षेत्राच्या अधिवासात सोडण्यात आले.