कवी अश्लेष माडे यांचा वरोरा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात सन्मान

कवी अश्लेष माडे यांचा वरोरा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात सन्मान

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, सडक-अर्जुनी

गोंदिया जिल्हा सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथील साहित्य क्षेत्रात अगदी कमी वयात अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून, नावारूपास आलेले प्रीत कवी म्हणून ओळख असलेले कवी अश्लेष माडे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील राज्यस्तरीय कविसंमेलनात सन्मान करण्यात आला. शुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा अंतर्गत शुशिला काव्य विचार साहित्य मंच आयोजित पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा व कवयित्री प्रियंका वाकडे शेंडे यांच्या आर्त हुंकार या कविता संग्रहाचे प्रकाशन; नगरभवन कार्यालय वरोरा येथे दि. 10 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले.

या कवीसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश दुलेवाले प्रसिद्ध साहित्यिक समीक्षक नागपूर हे होते. तसेच साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध साहित्यिक यावेळी उपस्थित होते. या कविसंमेलनात राज्यभरातील कविंनी कविता सादर करून सहभाग घेतला. यावेळी या संमेलनात कोहमारा येथील कवी अश्लेष माडे यांनी 'माणसात जात शोधताना

रंगात आढळून आली

हिरवा भगवा निळा पांढरा

कपड्यात ढवळून गेली'

ही दर्जेदार कविता सादर करून, उपस्थित मान्यवरांचे व काव्य रसिकांचे मन जिंकले. माडे यांच्या कवितेची दखल घेऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवी अश्लेष माडे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व काव्यसंग्रह भेट देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापिका, सचिव प्रियंका शेंडे, मार्गदर्शिका शोभा वेले, कार्याध्यक्ष प्रभाकर दुर्गे, उपाध्यक्ष गंगा सपकाळे, प्रशासक स्नेहल वाकडे यांनी केले. वरोरा येथे सन्मान प्राप्त झाल्याबद्दल कवी अश्लेष माडे यांचे परिसरात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.