कादवा प्रतिष्ठानचे; विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
पालखेड बंधारा येथील कादवा प्रतिष्ठानच्यावतीने, गेल्या सात वर्षापासून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना कादवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. २०२३ या वर्षातील पुरस्कार विजेत्यांची नावे प्रतिष्ठानचे सरचिटणीस विठ्ठलराव संधान यांनी जाहीर केली आहेत.
करंजवण येथील प्रगतिशील शेतकरी विलास जाधव यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल तर मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले प्रा. डॉ. विलास देशमुख यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी झालेले ललित जाधव (कृषी उद्योग), प्रा.डॉ.आनंद अहिरे (साहित्य मित्र), देविदास निगळ (सांस्कृतिक), दीपक महाजन (सहकार), संगीता भोकनळ (प्रशासकीय), योगेश मातेरे (कृषी मित्र), संदीप चौधरी (शैक्षणिक), अतुल वाघ (उद्योजक), साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ (आदर्श संस्था) यांना कादवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कारांचे वितरण दि.१८नोव्हेंबर २०२३रोजी परशुराम साईखेडकर नाट्यगृह नाशिक येथे सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार मिठे यांनी कळविले आहे.