जि.प.प्रशासनाकडून गटविकास अधिकारी सन्मानित...
![जि.प.प्रशासनाकडून गटविकास अधिकारी सन्मानित...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_6650b7266cc2d.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
लोकसभा निवडणूकांमध्ये दिंडोरी लोकसभेचा सर्वांधिक मतदानाची टक्केवारी तसेच दिंडोरी लोकसभा अंतर्गत दिंडोरी - पेठ विधानसभेची सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी झाल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्यावतीने गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांना सन्मानित करण्यात आले.
लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील एकुण १३ जागेसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली.त्यात दिंडोरी लोकसभा मतदार संघात सर्वांधित ६६.७५ टक्के मतदान झाले असून राज्यात दिंडोरी लोकसभा मतदार संघ अव्वल ठरला आहे.त्याचबरोबर दिंडोरी लोकसभा मतदार संघातही दिंडोरी - पेठ विधानसभा मतदार संघात ७५.४२ टक्के मतदान झाले असून हे सर्वात जास्त मतदान झाल्याने दिंडोरीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी सत्कार केला. यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, प्रतिभा संगमनेरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या कामाकाजाचे कौतुक करण्यात आले.
प्रशासनाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले गेले.मतदारांना मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले. त्या आव्हानाला प्रतिसाद देत मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले आणि राज्यात दिंडोरी लोकसभेचा तसेच लोकसभेमध्ये दिंडोरी - पेठ विधानसभेला सर्वांधिक मतदान करण्याचा बहुमान मिळाला.त्याबद्दल मी सर्व मतदार व प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन करते.
नम्रता जगताप, (गटविकासअधिकारी,दिंडोरी)