घोटी गावच्या आराध्य दैवताचा पहिल्या महाप्रसादाचा मान, जनसेवा प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष-विष्णु ननवरे यांना मीळाला

घोटी गावच्या आराध्य दैवताचा पहिल्या महाप्रसादाचा मान, जनसेवा प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष-विष्णु ननवरे यांना मीळाला

NEWS15 प्रतिनिधी :  प्रवीण मखरे

सोलापूर : विविध सण-समारंभाच्या निमित्ताने गावामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात आणि त्यानिमित्ताने अन्नदान केले जाते. अन्न हे पूर्णब्रह्म असून, कोणत्याही दानापेक्षा अन्नदान हेच श्रेष्ठदान मानले जाते. शिवाय पितृपक्षातील दानाला आणखी महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत दानाचे महत्त्व सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत दानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. श्रीमद् भगवदगीतेत अन्नदानाचे महत्त्व सांगितले आहे. हिंदू धर्मासह जगातील सर्वच धर्मात अन्नदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे असे म्हणणे जनसेवा प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष  विष्णू ननवरे ह्यांच आहे. आणि गावा मध्ये आनेक लोक आपल पोट भरण्यासाठी आलेले असतात.! त्यात ऊसतोड कामगार असतील किंवा शेतमजूर असतील या सर्वांच्या पार्श्‍वभूमीवर या कष्टकऱ्यांच्या पोटात दोन घास जावे म्हणून घोटी गावचे आरध्य दैवत श्री कोटलिंग देवस्थान घोटी येथे नविन प्रकल्प सुरु केला. तो प्रकल्प असा की प्रत्येक महिन्यातील पहिल्या रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल तरी पहिल्या महाप्रसादाची सुरुवात ही जनसेवा प्रतिष्ठाण घोटी-विष्णु हरिदास ननवरे यांनी केली. श्री कोटलिंग मंदिरात देवाची आरती विष्णु ननवरे यांचे आई वडील यांच्या हातून होऊन महाप्रसादाचे आयोजन झाले.