शहरी प्रमाणे ग्रामीण भागातही पितृपंधरवाड्यात काकस्पर्श दुर्मिळ...

शहरी प्रमाणे ग्रामीण भागातही पितृपंधरवाड्यात काकस्पर्श दुर्मिळ...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून पितृ पंधरवाडा सुरु झाल्याने या पितृ  पंधरवड्यात कावळ्यांचा मान मोठा असतो मात्र शहराप्रमाणे ग्रामीण भागातही या कावळ्यांची संख्या कमी झाल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे. 

पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या या रूढी परंपरा आजही आधुनिक युगात पित्रांसाठी नैवेद्य दाखवण्याची व घराच्या कौलांवर, पत्र्यांवरही ठेवण्याची प्रथा कायम आहे.कावळ्यांकडे इतर वेळेस वेगळ्या पद्धतीने बघितले जाते त्यामुळे कुणालाही या कावळ्यांशी सोयरेसुत नसते मात्र पितृ पंधरवड्या च्या दिवसांत त्यांची काव काव ऐकण्यासाठी टाकलेल्या नैवेद्यास कावळ्यांनी स्पर्श करण्याची त्यांची तासनतास आपण घरांच्या छतावर वाट पहात असतो. त्यामुळे कधीही न आवडणाऱ्या कावळ्यांना सध्या पितृ पंधरवाड्या निमित्ताने अच्छे दिन आले आहे.

पितृ पंधरवाड्यादरम्यान आपल्या पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार नैवेद्य दाखवून घास देण्याची प्रथा परंपरा असल्याने या दिवसांत कावळ्यांना अधिक महत्व प्राप्त होते. परंतु निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या या कावळ्यांची संख्या कमी पहावयास मिळत असल्याने पित्रांच्या घासला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकत नसल्याने ‘काकस्पर्श’ दुर्मिळ होत असल्याने यावर पर्याय म्हणून गाईला नैवेद्य दाखवून पुढील कार्यक्रम केले जातात.