नवनाथ भक्त भास्करनाथ बाबा (बालू तात्या) यांच्या स्मरणार्थ भंडार महोत्सव साजरा...
![नवनाथ भक्त भास्करनाथ बाबा (बालू तात्या) यांच्या स्मरणार्थ भंडार महोत्सव साजरा...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_6593adc3af29d.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - खंडेराव पवार
धुळे : साक्री येथील नवापूर हायवे रोडा लगत नवनाथ महाराजांचे जागतिक देवस्थान आहे. या देवस्थान येथे दि. 1 जानेवारी 2024 रोजी सालाबादाप्रमाणे 55 वर्षांन पासून मोठा भंडाराचे आयोजन केला जातो.
भास्करनाथ बाबा (बालू तात्या) नवनाथ भक्त यांच्या स्मरणार्थने सर्व साक्री तालुक्यातील नवनाथ भक्त मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या भंडाराचे आयोजन करतात. भंडाराचे वैशिष्ठ म्हणजे संपूर्ण साक्री तालुक्यातील भावी भक्त नवनाथ महाराजांचा प्रसाद खाण्यासाठी पंधरा ते वीस हजार भाविक भक्त जेवण करून जातात. कोना कडून पैसे न घेता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतो.