विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाध्यक्षपदी - विजयकुमार मिठे

विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाध्यक्षपदी - विजयकुमार मिठे

मानवत (परभणी)येथे होणाऱ्या विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांची निवड करण्यात आली असल्याचे स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.अनंतराव गोलाईत यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

मानवत(परभणी)शहरात दरवर्षी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून संमेलनाचे हे सहावे वर्ष आहे. मंगळवार दि.६ फेब्रुवारी २०२४ रोजी मानवत येथे हे बालकुमार साहित्य संमेलन होणार आहे.या विभागीय बालकुमार साहित्य संमेलनास राज्यभरातून प्रसिद्ध कवी,चित्रपट कलाकार,रसिक,वाचक यांची उपस्थिती राहणार आहे.संमेलनास उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते माजी संमेलनाध्यक्ष देविदास फुलारी, रमेश चिल्ले,इंद्रजीत भालेराव, संगीताताई बर्वे,बाबासाहेब सौदागर, फ.मु.शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.

विजयकुमार मिठे हे गेल्या पन्नास वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कथा, कविता,कादंबरी,ललित,एकांकिका, आकाशवाणी श्रुतीका अशा विविध वाड्मय प्रकारात लेखन केलेले आहे. घोंगट्याकोर,कादवेचा राणा बुजगावणं, गावाकडची माणसं,माझी माणसं,लाऊक,येसन,हिरवी बोली,ओल तुटता तुटेना, हेळसांड,गाव कवेत घेताना, गावाकडचे आयडॉल,झाडांची झुलती माया,आम्ही साक्षर श्रीमंत,लेखणी उडाली आकाशी,मातीमळण, चांदणभूल,आभाळ ओल,कोंबडखुळ,आई जन्मभराची शिदोरी,अशी ग्रंथ संपदा प्रकाशित केली असून त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या"चांदणभूल" या ललित लेखांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए, बी.कॉम,बी.एससी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंचचे विठ्ठल संधान,तुषार वाघ, गोकुळ आव्हाड राजेंद्र गांगुर्डे, बापू चव्हाण यांनी मिठे यांचे अभिनंदन केले आहे.

न्यूज १५ मराठी प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक