लाखणी तालुक्याच्या ग्राम जेवणाळा येथे आढळला सतरंजा या दुर्मिळ प्रजातीच्या साप...
![लाखणी तालुक्याच्या ग्राम जेवणाळा येथे आढळला सतरंजा या दुर्मिळ प्रजातीच्या साप...](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64c48a3b6a759.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - दीनदयाल गिरेपुंजे
लाखनी : भंडारा जिल्यातील लाखनी तालुक्याच्या ग्राम जेवणाळा येथे सतरंजा ह्या प्रजातीचा दुर्मिळ साप आढळून आला असून, ग्राम जेवणाळा येथे पहिल्यांदाच असा दुर्मिळ प्रजातीचा साप आढळल्याने सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले.
हा एक निशाचर साप असुन,शरीरावर रुंद काळे व पिवळे आडवे पट्टे असून,शरीर त्रिकोणी आकाराचे असून,बोथट शेपटी हे या दुर्मिळ प्रजातीच्या सापाची ओळख आहे. या सापाची सरासरी लांबी ४.५ फूट; तर अधिकतर लांबी ७.५ फूट असते. हा साप जहाल विषारी असला तरी, हा साप शांत स्वभावाचा असतो. अन्य इतर साप हे ह्या सापाचे खाद्य असुन, स्थानिक भाषेत या सापाला सतरंजा साप म्हणतात असे सर्पमित्रांकडून पाहणी करून सांगण्यात आले असुन, ह्या सापाला सर्पमित्रांकडून निसर्ग मुक्त करण्यात आले आहे.