आडगाव टप्पा व पिंपळगाव बसवंत दिंडीचे पालखेड बंधारा येथे उत्साह स्वागत...

आडगाव टप्पा व पिंपळगाव बसवंत दिंडीचे पालखेड बंधारा येथे उत्साह स्वागत...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा येथील सुखदेव महाराज व निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील कच्चेशोर महाराज यांच्या दिंडीने मार्गक्रमण केले असून श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त जाणाऱ्या दिंडीचे दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील भाविकांकडून आज गुरुवार दि.१ रोजी सायंकाळी ६ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीने गावाच्या एसी पासून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात केले.

यावेळी प्रगतशील शेतकरी साहेबराव गायकवाड, सौ.अनिता गायकवाड, आनंद बोरसे, सौ. जयश्री बोरसे यांनी दिंडीच्या रथाची मनोभावे पूजा केली. दिंडीतील वारकऱ्यांनी व महिलांनी पारंपारिक अभंग भजन गायले सायंकाळी या दिंडीचा मुक्काम पालखेड गावात होऊन अन्नदाते गोविंद गायकवाड, पप्पू गायकवाड यांनी अन्नदान केले. त्यानंतर भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला यावेळी वारकरी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.