निलंगा येथे भाजपा युवा मोर्चातर्फे मतदार संघातील पत्रकारांचा सन्मान व सत्कार...

निलंगा येथे भाजपा युवा मोर्चातर्फे मतदार संघातील पत्रकारांचा सन्मान व सत्कार...

NEWS15 प्रतिनिधी : सुधाकर सूर्यवंशी

लातूर : जिल्ह्यातील निलंगा मतदार संघातील देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील प्रिंट  व इलेट्रॉनिक मिडिया या'सह डिजिटल मीडियामध्ये काम करणार्‍या पत्रकांराचा.! भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त दर्पण दिनाचे औचित्य साधून, पत्रकारांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

निलंगा मतदार संघाचे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी शिरूर अनंतपाळ, देवणी, निलंगा तालुक्यातील पत्रकारांचा भाजपा युवा मोर्चा कडून हा सन्मान करण्यात आला.

यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड. ज्ञानेश्वर चेवले, तालुकाध्यक्ष मंगेश, शाहूराज थेटे, माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे,  दगडूजी सोळुंके यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष राम काळगे, शकील देशमुख, नरेश बिराजदार आणि पत्रकार बंधू उपस्थित होते.