साक्री येथे बुद्ध पौर्णिमानिमित्त, भीम विचाराचा प्रवाह बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न...
NEWS15 प्रतिनिधी : खंडेराव पवार
धुळे / साक्री : जगाला शांती मानवताचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक गौतम बुद्ध यांच्या वैशाखी पौर्णिमा "बुद्ध जयंती" निमित्त.! साक्री येथील बुद्ध विहार नगरात बुद्ध विहार नगर बाबा ग्रुपच्यावतीने रात्री औरंगाबाद येथील प्रसिद्ध गायक संतोष मोरे यांचा भिम विचारांचा प्रवाह प्रस्तुत बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी मान्यवर म्हणून साक्री नगरपंचायत'चे नगरसेवक सुमित नागरे, नगरसेवक पंकज मराठे, चोपड्याचे गट विकास अधिकारी भरत कोसोदे, माजी सभापती प्रेरणा कैलास वाघ, जय मल्हार सेनेचे अध्यक्ष विठ्ठलभाऊ मारनर, भाडणेचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे, आरपीआयचे साक्री तालुका अध्यक्ष कमलाकर मोहिते, वंचित बहुजन आघाडीचे साक्री तालुका अध्यक्ष शरद वाघ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी बुद्धांच्या मूर्तीस मेणबत्ती प्रज्वलित करून व बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील व बुद्ध पूजा ग्रहण करून उपस्थित जनसमुदायास खीर दान करून बुद्ध -भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात महिला भगिनींची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडला. सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक राजेंद्र वाघ यांनी केले व प्रबोधन व सूत्रसंचालन डॉ. कैलास वाघ यांनी केले. बुद्ध विहार नगर बाबा ग्रुप साक्रीचे कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.