खराबवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजणार?
![खराबवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजणार?](https://news15marathi.com/uploads/images/202305/image_750x_645792a3849ab.jpg)
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : मागील तीन वर्षापासून प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या खराबवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. काही लोकांच्या राजकीय अस्थित्वासाठी व काहींच्या आडमुठ्या धोरणामुळे खराबवाडी ग्रामपंचायतची निवडणूक तब्बल मागील तीन वर्षापासून रखडी होती. आता त्याच निवडणुकीच्या संदर्भात १४ दिवसात अहवाल पाठवण्याचे फर्मानच न्यायालयाकडून जिल्हाधिकारी यांना आल्याने लवकरच खराबवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी खराबवाडी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होऊ शकते असा कयास बांधला जात आहे.
खराबवाडी ग्रामपंचायत निवडणूक येवढे दिवस का रखडली यावर आपण प्रकाश टाकला तर, काही लोकांच्या राजकीय महत्वकांक्षे पायी त्यांनी गावाला वेठीस धरून न्यायालयात वॉर्ड रचना मनाप्रमाणे करण्यासाठी याचिका दाखल केली. ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावूनही पुन्हा पुनर्रयाचिका दाखल करून तारीख पे तारीख न्यायलयात सुरू राहिले आणि गावाला तब्बल तीन वर्षे विकासापासून व सामाजिक उपक्रमापासून अक्षरशा: वंचित ठेवण्यात आले. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जर येवढ्या १० हजार लोकसंख्येच्या गावाला वेठीस धरले जात असेल तर याचा गावातील नागरिक नक्की निवडणुकीत योग्य तो विचार केल्या शिवाय राहणार नाहीत.
खराबवाडी ग्रामपंचायत निवडणूक नक्की का इतके वर्षे थांबली या बद्दल निवडणूक जाहीर होताचं सविस्तर नावांसह ऊहापोह केला जाणार आहे. आता फक्त निवडणुकीची प्रक्रिया याच महिन्यात पार पडावी असाही काहींचा प्रयत्न आहे. त्यात त्यांना किती यश मिळते माहीत नाही, पण जर या महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही तर, ही निवडणूक पावसाळा संपल्यानंतरच होईल अशीही चर्चा अधिकारी वर्गातून ऐकायला मिळत आहे. पण जी प्रक्रिया येवढे दिवस थांबली होती ती आता कुठे तरी सुरू झाल्याने गावातील नागरिक समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.