आणखी एक OBC चेहरा बारामतीच्या मैदानात.! ऍड. प्रियदर्शनी कोकरे बारामती लोकसभा लढणार...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - पुणे
पुणे जिल्ह्यात शिरूर लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत असून, विशेत: बारामती मध्ये अनेक घडमोडी घडत आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनीत्रा पवार ह्या महायुतीच्या उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते विजयबापू शिवतारे अपक्ष लढण्याच्या तयारीत असून, आता या निवडणुकीच्या रिगणात आणखी एक OBC चेहरा उतरणार आहे.
दौंड तालुक्यामध्ये ऍड. प्रियदर्शनी कोकरे यांनी दौरा केला असता; ओबीसीनी घराणेशाहीला बाजूला ठेऊन आणि आपल्या न्याय हकांसाठी एकत्र यावे असे आवाहन यावेळी प्रियदर्शनी कोकरे यांनी केले. काही दिवसांपूर्वी कोकरे यांनी बारामती लोकसभा लढवण्याची घोषणा केली होती. त्यानिमित्ताने त्यांनी दौंड तालुक्यात दौरे सुरु केले आहेत.
इंदापूर, बारामती, दौंड, भोर वेल्हा, मुळशी, पुरंदर, या मतदार संघामध्ये संदर्भात गाव चलो अभियानाच्या माध्यमातुन ओबीसी, बहुजन बांधवांना एकत्रीत करुन पुढील दिशा ठरवण्यासाठी गांव निहाय बैठका सुरु आहेत.
यावेळी प्रियदर्शनी कोकरे म्हणाल्या की, ओबीसी बहुजन समाजाने आता जागरूक झाले पाहिजे. जास्तीत जास्त आपले लोकसभा आणि विधानसभेला प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत. घराणेशाहीला विरोध करणे गरजेचे आहे. कारण गेली 40 वर्षे झाली पवारांच्या घरात सत्ता आहे. त्याच लोकांना किती दिवस संधी द्यायची सर्वसामान्य घरातील लोकांनी काय सतरंजा उचलायच्या का? असा प्रश्न यावेळी ऍड. प्रियदर्शनी कोकरे यांनी उपस्थित केला.
ओबीसी, बहुजन समाज बांधवांमध्ये एकजुटीसाठी गाव चलो अभियानाच्या माध्यमातुन गोतोंडी येथे त्या बोलत होत्या. ओबीसी, भटके विमुक्त,बहुजन बांधवांच्या गावा-गावांत जाऊन जनजागृती करण्यासाठी बैठका सुरू असल्याची माहिती ऍड. प्रियदर्शनी कोकरे यांनी दिली.