जागतिक महिला दिनी.! घारगावच्या सरपंच पदी सौ. लक्ष्मी सरवदे यांची बिनविरोध निवड...
![जागतिक महिला दिनी.! घारगावच्या सरपंच पदी सौ. लक्ष्मी सरवदे यांची बिनविरोध निवड...](https://news15marathi.com/uploads/images/202303/image_750x_64095248e2b24.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : प्रवीण मखरे
सोलापूर : घारगाव ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच पदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाच्या सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. घारगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ८ मार्च रोजी निवडणूक झाली असून, या निवडणुकीत लक्ष्मी सरवदे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने; त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जगताप_शिंदे गटाचे उपसरपंच सतीश पवार तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील गटाचे इतर सर्व सदस्य यामध्ये माजी सरपंच लोचना पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता होगले, सदस्य आशा देशमुखे ,माजी सरपंच अनिता भोसले, सदस्य दत्तात्रय मस्तुद सर्वजण उपस्थित होते. या सर्वांनी सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड केली.
निवड ८ मार्च या जागतिक महिला दिना रोजी घेण्यात यावी. अशी लेखी मागणी सर्व सदस्यांनी तहसीलदार समीर माने यांचेकडे केली, त्यानंतर तहसीलदार यांनी या निवडीसाठी परवानगी दिली. या सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी अनिल ठाकर यांनी काम पाहिले. सोबत तलाठी मयूर क्षिरसागर तसेच सहाय्यक सोमनाथ खराडे घारगावचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक रवींद्र काळे भाऊसाहेब यांनी काम पाहिले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष अंड. शशिकांत नरुटे तसेच मा.सरपंच किरण दादा पाटील मा.सरपंच कल्याण दादा होगले व ग्रामस्थ उपस्थित होते. घारगाव ची सरपंच निवड ८ मार्च या जागतिक महिला दिना रोजी प्रशासनाने घेतल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी तहसीलदार समीर माने तसेच मंडळ अधिकारी अनिल ठाकर व प्रशासनाचे आभार मानले.