जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खेड तालुका पत्रकार संघ व महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान...!
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने चाकण व महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याच्या महिला भगिनीचा यथोचित सन्मान करण्यात आला.

महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. पण महिला दिनाची संकल्पना कशी उदयास आली हे जर कुणाला विचारले तर ते बहुतेक क्वचितच कुणाला तरी सांगता येईल. पण जागतिक महिला दिन संकल्पना १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा जागतिक महिला-दिन म्हणून स्विकारावा असा ठराव क्लाराने मांडला त्यास सर्वानुमते सहमती देण्यात आली. अन त्यानंतर जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला.

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमध्येही ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा होऊ लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.

१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने सयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करावा यासाठी आवाहन केले. अन तेव्हा पासूनच भारतात व्यापक स्वरुपात जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला.

महिला दिनाच्या व्यापक्तेमुळे महिला ज्या विविध क्षेत्रात आपला दैदीप्यमान ठसा उमटवत आहेत याची सर्व क्षेत्रातून दखल घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिला दिनाचे औचित्य साधून लोकशाहीचा चौथा स्तंब असलेल्या पत्रकार बांधवांनी चाकण व महाळुंगे पोलिस ठाण्यातील महिला भगिनीचा सन्मान केला. त्याच बरोबर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून हद्दीतील दक्षता samitichya महिला सदस्या, महिला पोलिस पाटील तसेच पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अंमलदार यांच्याही सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मानासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सम्राट राऊत, जेष्ठ पत्रकार कल्पेश भोई, संघटक लहू लांडे, सदस्या अँड रूपाली परदेशी, कुमार नाईकनवरे, अजय जगनाडे यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस उपनिरीक्षक संगीता भंडरवाड, पोलीस उपनिरीक्षक विकास मडके, महिला पोलीस अंमलदार सुप्रिया शिंदे, रेश्मा शिंदे, अस्मिता कुरणे, उज्ज्वला घनवट, निलम काकडे, कविता बर्डे, हैद्राबाद टी मिठलेश्वरी, महाळुंगे इंगळे गावचा सरपंच मंगल भोसले, माजी सरपंच मयुरी म्हाळुंगकर यांचा सत्कार संपन्न झाला.
कार्यक्रमाला आवर्जूब महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे महिला दक्षता कमिटीच्या सरिता वाघमारे, बेबीताई कड, हेमलता भोपे, पोलीस पाटील कांबळे यांचाही महाळुंगे पोलीस ठाण्याच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेंद्र कोणकेरी, संपत मुळे, तानाजी गाडे, चेतन मुंडे व पोलीस पाटील सचिन भोपे यांनी केले होते. सन्मान केल्याबद्दल सर्व सन्मानार्थी महिला भगिनींनी यांनी आयोजकांचे आभार मानले...