स्व. कु. प्रितम बाळासाहेब बागडे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ रक्तदान व नेत्र,मोती बिंदु शस्रक्रिया शिबिराचे आयोजन तसेच अनाथ मुलींना शालेय साहित्याचे वाटप...!

स्व. कु. प्रितम बाळासाहेब बागडे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ रक्तदान व नेत्र,मोती बिंदु शस्रक्रिया शिबिराचे आयोजन तसेच अनाथ मुलींना शालेय साहित्याचे वाटप...!

News15 मराठी प्रतिंनिधी सुनील बटवाल

 चाकण(चिंबळी) : मागील तीन वर्षांपूर्वी करोना काळात कुरूळी येथील युवा उद्योजक व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात नोकरीत असलेले स्व. कु. प्रितम बाळासाहेब बागडे यांचे निधन झाले असुन त्यांच्या स्मृती दिनानिमित्त गेल्या तीन वर्षांपासून कुरूळी येथे रक्तदान शिबिराचे व नेत्र शिबिर आणि मोती बिंदू शश्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते.

यावर्षीही या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा शुभारंभ सरपंच, उपसरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य  व सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर, चिंबळी येथील मदर तेरेसा अनाथ आश्रमात मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले अशी माहिती माजी ग्रा.प. सदस्य बाळासाहेब बागडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन समाज मंदिर कुरुळी येथे स्व. कु. प्रितम बाळासाहेब बागडे मित्र परिवार व माजी ग्रा. प. सदस्य स्वप्निल कांबळे, संत सावतामाळी तरूण मंडळ, नवचैतन्य समाजसेवक मित्र मंडळ व सिध्दीविनायक बैल गाडा संघटना तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.