खेड तालुक्यातील आंबेठाण गावातील दवणे कुटूंबाचा स्तुत्य उपक्रम...!

खेड तालुक्यातील आंबेठाण गावातील दवणे कुटूंबाचा स्तुत्य उपक्रम...!

News15 मराठी प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले                      

चाकण : खेड तालुक्यातील आंबेठाण गावातील कै.ह.भ.प.ज्ञानोबा रामभाऊ दवणे यांचे वृध्दापकाळाने रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी निधन झाले होते. आंबेठाण गावातील दवणे कुटूंबाने स्तुत्य उपक्रम म्हणुन पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडामालक फायनल सम्राट कैलासवासी ह.भ.प. ज्ञानोबा रामभाऊ दवणे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले असून त्यांच्या रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमाच्या वेळी कुटुंबाने आणि पाहुणे मंडळी व ग्रामस्थांनी एक चांगला निर्णय पर्यावरण पूरक निर्णय घेतला आहे.

त्यांनी दवणे बाबांच्या रक्षा होत्या त्या नदीच्या पाण्यात न सोडता त्या जमिनीत खड्डे करून त्यात वृक्षारोपण करून झाडांना देण्यात आल्या. यावेळी दवणे कुटुंबाने वड,आंबा,चंदन,फणस अशा विविध पद्धतीची झाडे लावून रक्षाविसर्जन केले. यावेळी कुटुंबातील सर्व मंडळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे माजी सरपंच सुभाष मांडेकर, चंद्रकांत आरोडे, देवराम दवणे, निवृत्ती दवणे, संतोष मांडेकर, बाळासाहेब पडवळ आदी मन्यावर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.