ज्येष्ठ नेत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त; दवन हिप्परगा येथे मोफत मधुमेह-रक्तदान-नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप शिबिर...

ज्येष्ठ नेत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त; दवन हिप्परगा येथे मोफत मधुमेह-रक्तदान-नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप शिबिर...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी देवणी, लातूर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलकडून दवन हिप्परगा येथे मोफत मधुमेह रक्तदान नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप शिबिर 

देवणी तालुक्यातील दवण हिप्परगा तसेच महादेववाडी या गावात आज घेण्यात आलेल्या शिबीरात २१५ रुग्णांनी लाभ घेतला तर यात २२ मोतीबिंदू रुग्णांची नोंदणी झाली आहे.

कॉग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वाढदिवसानिमिताने  देवणी तालुक्यातील दवण हिप्परगा येथे कॉंग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भांताब्रे यांच्या माध्यमातून भव्य मोफत शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये दोन गावासह तालुक्यातील रुग्णांनी लाभ घेतला. यात तज्ञ डॉक्टर डॉ.स्नेहा कांबळे, राहुल गावकरे, ज्योती पाटील, धनराज चित्रे, विवेक टिळे शिवराज कारभारी  हे उपस्थित होते.