सारा बिल्डरच्या चालढकलीमुळे सदनिका धारक यांच्यात हमरी तुमरी, मारामारी होता होता वाचली...!
![सारा बिल्डरच्या चालढकलीमुळे सदनिका धारक यांच्यात हमरी तुमरी, मारामारी होता होता वाचली...!](https://news15marathi.com/uploads/images/202301/image_750x_63d698f5b603f.jpg)
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : सारा बिल्डरच्या चालढकलीमुळे सारा वसाहतीच्या सी फेज मधील सी-१० च्या सदनिका धारकांच्यामध्ये सायंकाळी मोठी हमरा तुमरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही हमरा तुमरी इथ पर्यन्त पोहचली होती की काही वेळात काही स्थानिक सदनिका धारक यांनी मध्यस्थी केली नसती तर त्या हमरा तुमरीचे हाणामारीत रूपांतर झाले असते अशी चर्चा वसाहतीत रंगू लागली आहे.
सारा बिल्डरने रहिवाशांना सदनिका विकल्या खर्या पण कुणाच्या पार्किंग कुठे? कुणाला पार्किंग विकली एक आणि गाडी उभी करतोय दुसराच, येवढेच नाही तर पार्किंग नियमांचे उल्लघन करून बिल्डरने पार्कींच्या मार्किंग ड्रेनेज लाईन वर मारल्याने अनेक सदनिका धारकाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यातूनच तू इथेच का गाडी लावली, तुझी गाडी माझ्या हद्दीत लागली, तू पार्किंग विकात घेतली का? असे अनेक प्रश्न निर्माण होऊन त्याचे असे हमरा तुमरीत रूपांतर व्हायला लागले आहे. यातूनच पुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात त्याचा प्रत्येक्ष परिणाम बिल्डरला सहन करावा लागेल यात शंका नाही.
बिल्डरकडून गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याच्या अगोदरचे सुयोग्य नियोजन नसल्यामुळे असे वाद भविष्यातही उभाळले तर नवल वाटायला नको. सारा बिल्डरने निर्माण केलेल्या नवीन सी वसाहतीचा पाण्याचा मुद्दा या अगोदरच गाजला होता. त्या मुद्दयासाठी सदनिका धारकांनी थेट सारा बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा ही काढला होता. फक्त बिल्डरने तोंडी आश्वासन देवून हा मोर्चा मोडीत काढला होता. या आंदोलनात काही सदनिका धारकच फितूर झाल्याने आणि काहींना कायदेशीर न्याय शून्य असूनही पुढार पणाच्या नादी लागल्यामुळे अनेक सदनिका धारकांचे मोठे नुकसान होत असल्याचीही चर्चा सी वसाहतीत चर्चिली जात आहे.
सारा बिल्डरने सर्वांच्या समक्ष नक्की अग्रिमेंट काय आहे. त्यात कोणत्या कोणत्या तरतुदी दिल्या आहेत त्या पूर्ण कधी होणार आहे याच्यावर चर्चा करून सदनिका धारकांच्या मनातील शंकांचे निरसन वेळीच करायला हवे. नाहीतर बिल्डरच्या विरोधातील असंतोष उफाळायला वेळ लागणार नाही. आता हमरी तुमरीवर भागले उद्या हाणामारी होईल आणि त्यापुढे कोर्ट कचेर्या व्हायला वेळ लागणार नाही.
निलेश यादव व अनंत तिवारी यांचे बातमीत नजर चुकीने नावे आल्या बद्दल वाहिनी दिलगिरी व्यक्त करत आहे.