सामाजिक : खराबवाडी गावात लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी, शिवव्याख्याते संपत गारगोटे यांच्या व्याख्यानाने परिसर दुमदूमला...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावातील लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीच्या माध्यमातून १०५ वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीचे विशेष आकर्षण म्हणजे या वेळी शिवव्याख्याते संपत गारगोटे सर यांचे अंगावर शहारे आणणारे डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्यावरील व्याख्यानाने परिसर दुमदुमून निघाला..
यावेळी गारगोटे सरांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून अण्णाभाऊ साठे कसे जगले आणि त्यांनी वंचित समाजाला नक्की काय संदेश दिला या विषयी सविस्तर व्याख्यानातून उजाळा दिला.. यावेळी त्यांनी वंचित घटकांना आण्णाभाऊ साठे यांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करा.त्यांचे विचार आचरणात आणले तर कुठे तरी आपला समाज विचारांनी पुढे गेल्या शिवाय राहणार नाही असा उपदेशपर संदेश दिला.
याच बरोबर वंचित घटकाना कलेची देण असते फक्त त्याला घडवायचं कसं हे आण्णाभाऊ साठे यांच्या विचारातून समाज्याने घ्यावे असेही गारगोटे सर यांनी सांगितले.
यावेळी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्यावर रचलेल्या सुमधुर गायनाचा कार्यक्रम गायिका गायत्रीताई शेलार यांच्या उपस्थिती संपन्न झाला. खराबवाडी गावातील वंचित व बहुजन समाजातील नागरिकांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. यावेळी वाजता गाजत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गणेश बोत्रे, रवि धाडगे, नवनाथ म्हस्के आदी मान्यवर यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल आपले विचार मांडले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मच्छिन्द्र गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे, खराबवाडी गावचे माजी उपसरपंच रवींद्र धाडगे, सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल बिरदवडे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तेजेस वाडेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लोंढे, हर्षल खराबी, किरण कड, गुलाब पवार, अमर खराबी, अमोल पाटोळे, नवनाथ म्हस्के, हर्षल लोंढे, आकाश राजगुरू, संजय अवघडे मान्यवर उपस्थिती होते.