सहा विधानसभा मतदार संघातून निवडून येणारा माजी खासदार जिल्हा नियोजनवर गेल्यावर दिलीप मोहिते यांना शह देण्याची भाषा करतात, मला काय शह देणार : आमदार दिलीप मोहिते पाटील

सहा विधानसभा मतदार संघातून निवडून येणारा माजी खासदार जिल्हा नियोजनवर गेल्यावर दिलीप मोहिते यांना शह देण्याची भाषा करतात, मला काय शह देणार : आमदार दिलीप मोहिते पाटील

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

खेड (राजगुरूनगर): महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेला शिवराज काळुराम राक्षे यांचा खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थित सत्कार समारंभ आयोजित केला होता.

यावेळी खेड - आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवराजच्या कौतुकासह राजकीय फटकेबाजीही भाषणातून केली. सहा विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे माजी खासदार यांनी जिल्हा नियोजनवर निवड झाल्यावर जिल्हा नियोजनाच्या बैठकीत बोलले कि मी जिल्हा नियोजनवर फक्त दिलीप मोहिते यांना शह देण्यासाठी बसलोय. पण ज्या जिल्हा नियोजन समिती सदस्याला २५ लाख रुपये मिळतात, ज्या कार्यकर्त्यांकडे कोणते पद नसते त्याला हे पद दिले जाते आणि ते काय मला शह देणार असा उपरोक्त टोला आमदार दिलीप मोहिते यांनी लगावला.

या माजी खासदार यांना फक्त एकच उठले कि खेड तालुका, फक्त तालुक्याचे कामे कसे अडवता येतील, दिलीप मोहितेनी जे कामे केले ते डोळ्यात खूपत असल्याने मनात काहीतरी द्वेष धरून दिलीप मोहिते यांच्या कामात आडकाठी आणायची एवढाच त्यांचा उद्योग असल्याचा टोलाही आमदार दिलीप मोहिते यांना माजी खासदार शिवाजी आढळराव यांना लगावला. आम्ही पंचायत समितीची इमारत होऊ नये किंवा सुरेश गोरे यांच्या नावाला विरोध मुळीच नव्हता. फक्त सगळे कार्यालय एकाच ठिकाणी घेऊन सर्व सामान्य जनतेची सोय व्हावी अशी आमची मागणी होती. पण या छोट्या गोष्टीचे भांडवल करून त्यांनी त्याचे राजकारण केले.

दिलीप मोहिते तालुक्यात चांगले काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या कामात जाणून बुजून अडथळा आणणे. राज्यातील विरोधी पक्षाच्या आमदारांचा निधी अडवणे असे सुडाचे राजकारण राज्यात सुरू आहे असाही आरोप आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सरकारवर लावला.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तालुक्याच्या व राज्याच्या राजकारणावर बोलणे टाळले. मी योग्य वेळी माझी परखड भूमिका मांडेल असे सांगितले. त्यांनी महाराष्ट्र केसरी झालेले शिवराज काळुराम राक्षे यांचे कौतुक करताना एका गरीब घरातील मुलाने वडिलाकडे फक्त उपजीविकेसाठी २ एकर शेती, दूध व्यवसाय याच्या जोरावर संघर्षातून शिवराजला त्यांच्या वडिलांनी घडवले. त्यांच्याच कष्टाचे हे फळ म्हणावे लागेल. आजचा मोठा सत्कार सोहळा बघून शिवराजच्या वडिलांना, कुटूंबाला नक्कीच अभिमान वाटतं असेल. असे शिवराज सारखे अजूनही मल्ल भविष्यात तयार व्हायला हवेत. त्यात मुलींचाही सहभाग मोठा असायला हवा असे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सांगितले. शिवराज राक्षे यांना राज्यसरकारकडून शासकीय सेवेत नोकरी मिळावी यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राक्षेवाडी ग्रामस्थ तसेच शिवराज राक्षे यांच्या मित्र परिवाराकडून करण्यात आले होते. यावेळी शिवराज राक्षे यांना आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून ५ लाख रुपये व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तसेच राक्षेवाडी ग्रामस्थ यांच्याकडून असे एकूण ३२ लाख रुपयांचा धनादेश शिवराज राक्षे यांना विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातून ग्रामस्थ उपस्थित होते.