जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या ट्रॉफीचे अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते अनावरण...

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या ट्रॉफीचे अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते अनावरण...

N15 प्रतिनिधी असलम शेख - लातूर

लातुरातील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण सिनेअभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी अभिनेत्री जेनेलिया देशमुख, आ. धीरज देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीय उपस्थित होते. या स्पर्धेचा अंतिम सामना लातूर शहर आणि रेणापूर संघात झाला. यात विजय मिळवीत लातूर शहर संघाने विजेतेपद पटकावले. 

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये असलेली गुणवत्ता पुढे येण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. या स्पर्धेमुळे खेळातील टॅलेंटला प्रोत्साहन मिळत असून, अशा प्रकारच्या स्पर्धा भरविणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अभिनेते रितेश देशमुख यांनी दिली आहे.