भाजपा युवा मोर्चा नमो चषक स्पर्धेचे खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन संपन्न
![भाजपा युवा मोर्चा नमो चषक स्पर्धेचे खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन संपन्न](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65c0cb77b69ca.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
भाजपा युवा मोर्चा नमो चषक आयोजित हाॅलीबाॅल स्पर्धेचे व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकरराव श्रंगारे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपाने प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणुक प्रमुख गणेश दादा हाके पाटील,ओबीसी चे प्रदेश सचिव ज्ञानोबा बङगीरे ,माजी सरपंच बालाजी सारोळे तालुकाध्यक्ष.
प्रतापराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी,ओबीसी चे जिल्हा सरचिटणीस महेश बिलापट्टे ,युवा मोर्चाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य विवेकानंद उजळंबकर ,प्रदेश निमंत्रित सदस्य बालाजी होळकर, दत्तात्रेय जमालपुरे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे,शहराध्यक्ष सुशांत गुणाले,तालुका सरचिटणीस माणिक नरवटे ,बुथ विस्तारक चंदशेखर डांगे,गणेश कापसे, बालाजी पडोळे,महीला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे,परमेश्वर आढाव, मुख्याधिपीका सौ. आशा रोडगे अदिसह भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थित होते.
शिरुर ताजबंद येथील महेश विद्यालयाच्या प्रांगणात व्हॉलीबॉल स्पर्धेचा शानदार उदघाटन सोहळा खासदार सुधाकरराव श्रृगांरे व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला. तीस व्हॉलीबॉलच्या संघानी स्पर्धेत सहभाग घेतला तर अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील चित्रकला स्पर्धेत एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.