वि. वा शिनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगांव दिंडोरी येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा...

वि. वा शिनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगांव दिंडोरी येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा...

NEWS15 प्रतिनिधी - नाशिक

तळेगांव (दिंडोरी) येथील उन्नती एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. विमलताई वासुदेव शिनकर माध्यमिक विद्यालय येथे.! वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सरस्वती प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब सोनजे व M & M कंपणीचे मालक मनोहर शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमाकांत अलई, दिलीप वाणी, चंदन मेखे, धांडे तात्या, हरिभाऊ मुसळे, सुभाष मुसळे, संजय मालपुरे, बापु शिनकर, सरपंच अनिता चारोस्कर उपसरपंच प्रविण कथार व रामबंधू कंपनीचे मॅनेजर सूरज सिंग आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात अतिशय छान असे नाटक, देशभक्ती गीत, लावणी यासारख्या विविध प्रकारच्या नृत्याचा समावेश होता.

कार्यक्रमाचे अतिथी मनोहर शेटे यांनी, त्यांच्या बालपण व शालेय जीवनातील प्रसंग सांगितले व विद्यार्थ्यानी विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभागी व्हावे व आपल्या अंगी असलेले कलागुणांना वाव द्यावी असे आवाहन केले. तर दुसरे पाहूणे विशाल वाणी संचालक मानवी पॅकर्स कंपनी लिमिटेड तळेगाव दिंडोरी; यांनी देखील गुणवंत विद्यार्थ्यांना शूभेच्छा देऊन, त्यांनी बालपणापासून एकदम खडसर परिस्थिती असताना गोळ्या बिस्कीट विकत आज मोठ्या कंपनीचे मालक कसे बनले हा प्रवास विद्यार्थ्यांसमोर सांगितला. तर संस्थेचे सरचिटणीस प्रवीण अमृतकर यांनी देखील गुणवंत विद्यार्थ्यांना शूभेच्छा दिल्या आणि  विद्यार्थ्याच्या कलेचे तोंडभरून कौतुक केले.

उन्नती  एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष आबासाहेब सोनजे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी देखील गुणवंत व विद्यार्थ्यांनी आपल्या कला, गुण, व कौशल्य, बरोबर अभ्यासाकडे देखील तितकेच लक्ष द्या असे आवाहन केले आहे. हरिभाऊ मुसळे नामपूरकर संचालक उन्नती इजुकेशन सोसायटी यांनी विद्यालयातील 400 विद्यार्थ्याना खाऊ वाटप केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खैरनार व ठाकूर मॅडम यांनी केले तर आभार श्री. क्षिरसागर सर यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.