नंदनवन येथे स्केटिंग स्पर्धेत उमरेड स्केटिंग अकॅडमीने जिंकली ११ पदके...

नंदनवन येथे स्केटिंग स्पर्धेत उमरेड स्केटिंग अकॅडमीने जिंकली ११ पदके...

NEWS15 मराठी प्रतिनिधी -  राजु जांभुळे, उमरेड

रोलर स्पोर्ट्स कोचेस एसोसिएशन नागपुरद्वारा नंदनवन नागपूर स्थित नागपूर महानगर पालिकेच्या स्केटिंग ग्राउंडवर; नुकतीच भव्य स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्केटिंग स्पर्धेत ४०० स्केटर्स ने भाग घेतला होता. यात उमरेड स्केटिग अकॅडमी स्पर्धकांनी ११ पदके जिंकली. या स्पर्धेचे उद्घाटन नागपुर महानगर पालिकाचे क्रीड़ा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर याचे हस्ते आज १४ करण्यात आले होते.

उमरेड स्केटिंग अकॅडमीचा संघ ह्या स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाला होता. उमरेड स्केटिंग अकॅडमी च्या ११ स्केटर्स ने उत्तम प्रदर्शन करीत एकूण ११ पदके जिंकली,ज्यात ४ गोल्ड, २ सिल्वर व ५  ब्राँझ मेडल चा समावेश आहे. ह्या स्केटिंग स्पर्धेत मेडल्स जिंकणारे उमरेड स्केटिंग अकॅडमीचे स्केटर्स आहेत. सर्व विजयी स्केटर्स  खेळाडू उमरेड स्केटिग अकॅडमीचे आहेत. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई बाबा व कोच रवींद्र मिसाळ यांना दिले आहे.