BREAKING.! महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यापाल, भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर...

BREAKING.! महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यापाल, भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर...

NEWS15 प्रतिनिधी - मुंबई

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला असून, याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तसेच रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत.

वादग्रस्त वक्तव्य आणि इतर कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते.

राज्याचे नवे (20 वे) राज्यपाल.! 

दरम्यान; रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला. रमेश बैस 1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते. 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. छत्तीसगढ राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते. रमेश बैस यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे.

दरम्यान, कोश्यारी यांच्या राजीनामा मंजूर केल्यानंतर विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना खसादर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिल्या असून, "देर आए दुरुस्त आए" म्हणत राज्यपाल कोश्यारी यांना टोला लावला आहे.