पालखेड बंधारा येथे सोमवार दि.१९ रोजी शिवजयंती उत्सव सोहळा...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे सोमवार दि.१९ रोजी येथील खंडेराव महाराज मंदिराच्या प्रांगणात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.३० वा. मान्यवरांच्या हस्ते श्रींचे मूर्ती पूजन होणार असून, ९ वा. शिव व्याख्याते संदीप पवार (चांदवडकर) व शिवव्याख्याती कु.पायल घुमरे यांचे व्याख्यान होणार आहे. तर सायंकाळी ६ वा. शिव आरती व भव्य मिरवणूक होणार आहे. तरी शिवप्रेमी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.