प्रा.लक्ष्मण महाडिक यांना गोदावरी पुरस्कार जाहीर

प्रा.लक्ष्मण महाडिक यांना गोदावरी पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

पिंपळगाव बसवंत येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.लक्ष्मण महाडिक यांना जालना येथील उर्मी ट्रस्टच्यावतीने साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल देण्यात येणारा सन २०२३-२४चा राज्यस्तरीय गोदावरी साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रा.लक्ष्मण महाडिक यांचे कुणब्याची कविता’आणि ‘स्त्रीकुसाच्या कविता’ हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘कुणब्याची कविता’ हा काव्यसंग्रह शेतकऱ्यांच्या जीवनातील भेदक आणि वास्तव कवितेत मांडले आहे. हा काव्यसंग्रह अमरावती विद्यापीठात एम.ए मराठीला दुसऱ्यादा अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आला आहे.हा काव्यसंग्रह ग्रामीण मराठी कवितेत मैलाचा दगड ठरला.अनेक समीक्षकांनी त्यावर भरभरून लिहिलं आहे.त्यांच्या  ‘ स्त्रीकुसाच्या कविता’ या काव्यसंग्रहातील कविता या स्त्री जाणिवेच्या कविता आहेत. या काव्यसंग्रहाच्या मध्यवर्ती स्त्री आहे.या दोन्ही काव्यसंग्रहांना महाराष्ट्रातील  प्रतिष्ठतेचे राज्यस्तरीय साहित्य  पुरस्कार प्राप्त झालेले आहेत कुणब्याची कविता हा काव्यसंग्रह महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन त्याना सन्मानित केले आहेत.१९९० नंतरच्या लिहू लागणाऱ्या पिढीत प्रा लक्ष्मण महाडिक यांच्या कवितेने आपला वेगळा ठसा उमटविला आहे.विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहेत.

२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता जालना येथील कोठारी हिल्स परिसरातील विवेकानंद अकादमीच्या सांस्कृतिक सभागृहात कविवर्य शिंदे कविवर्य फ.मू.कविवर्य प्रा.जयराम खेडेकर,यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार कैलास गोरंट्याल,जालना यांच्या शुभहस्ते.तसेच जेष्ठ काँग्रेस नेते,ज्ञानेश्वर भांदरगे पाटील,जालना येथील प्रयाग सायन्स अकॅदमीचे संचालक श्रीनिवास हजारे, सुधीर हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्पन्न होणार आहेत.गोदावरी साहित्य पुरस्काराचे स्वरूप पंचवीस हजार रुपये रोख सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे आहेत.कविवर्य फ.मु. शिंदे यांच्या हस्ते गोदावरी काव्य पुरस्काराने प्रा लक्ष्मण महाडिक यांना सन्मानित करण्यात येणार आहेत.यावेळी ऊर्मी काव्य पुरस्कार  पाच हजार रुपये,सन्मान चिन्ह,केज येथील कवयित्री सीमा पाटील यांना तर कृषिधन कविवर्य ना.धो.महानोर काव्यपुरस्कार पाच हजार रुपये रोख,सन्मान चिन्ह मुंबई येथील कवयित्री लता गुठे यांना प्रदान करण्यात येणार आहेत.यावेळी ऊर्मी रौप्यमहोत्सवी विशेषांक २०२३ प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते सम्पन्न होणार आहे.त्यानंतर कविसंमेलन होणार आहेत.यात कवयित्री सिमा पाटील( केज), कविवर्य लक्ष्मण महाडिक (पिंपळगाव बसवंत )कविवर्य फ.मु.शिंदे,(औरंगाबाद) लता गुठे(मुंबई) प्रा. कविवर्य जयराम खेडेकर(जालना) तर सूत्रसंचालन : प्रा. डॉ.शशीकांत पाटील,(जालना) करणार आहे.

 प्रा.लक्ष्मण महाडिक यांना जाहीर झालेल्या गोदावरी साहित्य पुरस्काराबद्दल साहित्य व सामाजीक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.