कोसमतोंडी येथे संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचा समारोप..!
![कोसमतोंडी येथे संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचा समारोप..!](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65a672d9a49a4.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी सुधीर शिवणकर
गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथे संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचा समारोप १३ जानेवारी रोजी करण्यात आला.
कोसमतोंडी येथील हनुमान मंदिर देवस्थान परिसरात ७ जानेवारी ते १३ जानेवारी पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कथा सप्ताहात सुश्री साध्वी यशोदामाई गायत्री शक्तीपीठ भंडारा यांचे सुमधूर वाणीतून भागवत कथा ज्ञानयज्ञ प्रवचन करण्यात आले. भागवत सप्ताहामध्ये दिपप्रज्वलन तीर्थस्थापना हरिपाठ करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. दररोज सकाळी काकळ आरती, प्रभात फेरी, सांयकाळी हरिपाठ व भागवत कथेचे सादरीकरण करण्यात येत होते. भागवत सप्ताहात रांगोळी स्पर्धा, हार स्पर्धा व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. भागवत सप्ताहात कलश पुजन, शोभायात्रा, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन लिला, हनुमान लिला, काली माता आदि. विविध प्रसंग कथा प्रवचनातून प्रबोधित करण्यात आले.
समारोपाचे दिवशी भागवत सप्ताहाची भव्य मिरवणूक व कलश यात्रा गावात काढण्यात आली. आणि नंतर गोपाळकाला व महाप्रसाद वितरण करून सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यामध्ये गावातील महिला, पुरूष व बालगोपालांनी सहभागी झाले होते. भागवत सप्ताहाभर गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.