शिवनईत आजपासून किर्तन महोत्सव...
![शिवनईत आजपासून किर्तन महोत्सव...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_659d2e0216291.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक (दिंडोरी) : संतश्रेष्ठ श्री. निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव व श्री गुरुवर्य पांडूरंग महाराज घुले बाबांचा अमृतमहोत्सवानिमित्त; शिवनई पगारे वस्ती येथे आज मंगळवार दि.9 रोजीपासून किर्तन महोत्सव सुरु होणार असून, तो दि. 16 रोजी पर्यंत असणार आहे.
सप्ताहात रोज पहाटे काकडा भजन, श्री. निवृत्तीनाथ महाराज गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ तर सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व सायंकाळी साडेसहा ते साडे आठ वाजेपर्यंत नामवंत किर्तनकारांची किर्तनं होणार आहेत. दि.9 रोजी समाधान महाराज (रिंगणगावकर), रात्री अनिल महाराज पाटील (आळंदी), दि.10 रोजी सकाळी केशव महाराज (हगवणे), रात्री वैभव महाराज राक्षे, दि.11 रोजी वैराग्यमुर्ती तुकाराम महाराज जेऊरकर, रात्री ज्ञानेश्वर माऊली कदम, दि.12 रोजी सकाळी एकनाथ महाराज चतरशास्त्री, रात्री अर्जून महाराज लाड, दि.13 रोजी सकाळी कृष्णाजी महाराज चवरे, रात्री चैतन्य महाराज देगलुरकर, दि.14 रोजी सकाळी ज्ञानेश्वर महाराज कदम, रात्री संजय महाराज पाचपोर, दि. 15 रोजी सकाळी रामकृष्ण महाराज, रात्री पांडूरंग घुले यांचे किर्तन होणार आहे.
दुपारी तीन ते सायंकाळी पाचदरम्यान मठाधिपती माधव महाराज घुले यांचे काल्याचे किर्तन होईल. नंतर महाप्रसादाने किर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हरिनाम सप्ताह आयोजकांनी केले आहे.