पिंपळनारेचे भुमीपुत्र सौरव साळवे यांना भालाफेक स्पर्धेत कांस्य पदक

पिंपळनारेचे भुमीपुत्र सौरव साळवे यांना भालाफेक स्पर्धेत कांस्य पदक

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

महाराष्ट् राज्य भालाफेक स्पर्धेमध्ये पिंपळनारेचे भुमिपुत्र सौरव साळवे यांना राज्य स्तरीय कांस्य पदक मिळाल्याने ग्रामस्थांनच्यावतीने पंडीत धर्मा विद्यालयात सत्कार समारंभ आयोजित केला होता प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिंतामन खांदवे हे होते. तर प्रमुख पाहुने म्हणून काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वाळु पाटील जगताप.संरपंच छगनराव कडाळे सोसायटी चेअरमन प्रकाश डंबाळे पाणी वापर संस्थेचे व्हा चेअरमन अमोल खांदवे पोलीस पाटील योगेश घोलप,तंटा मुक्ती अध्यक्ष प्रभाकर साळवे सदुभाऊ खांदवे,बाळासाहेब खांदवे समाधान खांदवे,रामचंद्र खांदवे सदाशिव दोमोदर, रमनलाल साळवे, विठल साळुके रामराव गुंड सुशिल साळवे आदी उपस्थित होते. यावेळी संकेत जाधव यांनी सौरभला पुढील स्पर्धा साठी सुभेच्छा दिल्या. सौरभने मिळालेल्या यशाबद्दल आपल्या आईवडीलांचे व ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच ग्रामीन भागातील विद्यार्थीनी क्रिडाक्षेत्रकडे जास्तित जास्त वळावे असे आव्हान केले.एक ग्रामीण भागातिल गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाने राज्यस्थरीय भाला फेक स्पर्धेत कास्य पदक मिळवून आपल्या कुटुंबाच गावाच व शाळेच व गुरुजनांचे नाव राज्यस्तरावर नेऊन ठेवल त्याबद्दल आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे असे वाळु जगताप यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्यधापक गायकवाड यांनी केले  सुत्रसंचालन  राठोड यांनी केले. याप्रसंगी ठाकरे काळे,चौधरी, चिंतामण खांदवे, मनिषा शखरे, दिलीप साळवे, माणिक साळवे,रामदास पाटील, आदी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. आभार पालवी  यांनी मानले.