अक्राळे येथे शुभम मोरे ठरला चांदीच्या गदेचा मानकरी...

अक्राळे येथे शुभम मोरे ठरला चांदीच्या गदेचा मानकरी...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन यात्रा कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोजाड,पांडुरंग गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. झालेल्या या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये  शुभम मोरे यांने चांदीची गदा जिंकत यात्राउत्सव कुस्तीचा मानकरी ठरला,

यात्रे निमित्त खंडेराव महाराज मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी पुजारी भूषण गायकवाड यांनी बारा गाड्या ओढल्या. यावेळी भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या मानाच्या कुस्तीसाठी योगेश देशमुख, राहुल शिंदे यांनी चांदीची गदा बक्षीस दिले. जालखेडचे पहिलवान शुभम मोरे व ओझरखेड त्रंबकेश्वर येथील शांताराम दिवे यांच्यात सामना होऊन शुभम मोरे विजयी झाले. त्यांना चांदीची गदा व यात्रा कमिटीच्यावतीने पाच हजार रुपये रोख देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी सजन फलाने, मनोज गाडे, बापू गायकवाड, हिरामण फलाने, सोमनाथ संधान, नितीन जाधव, नितीन शार्दुल, रमण बागुल, संदीप केंदळे, अविनाश फताळे, माधव गायकवाड, बाळासाहेब उदार, चंकू गायकवाड, रोशन संधान व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील जवळपास ६० नामवंत पैलवानांनी  कुस्तीस्पर्धेत भाग घेतला होता.