शेंद येथे धार्मिक कार्यक्रम कुस्त्यांनी महोत्सवाची सांगता...
![शेंद येथे धार्मिक कार्यक्रम कुस्त्यांनी महोत्सवाची सांगता...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65eed4eab5221.jpg)
प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ
लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेंद येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जन्मोत्सवा निमित्त महोत्सव समीतीच्यावतीने भव्य यात्रा भरविण्यात आली. तसेच जंगी कुस्त्याने महोत्सवाची सांगता करण्यात आली.
तालुक्यातील शेंदच्या ग्रामस्थांनी यंदा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून, पाच दिवस भव्य यात्राही भरविण्यात आली. यंदा यात्रेचे पहिलेच वर्ष असले तरी पंचक्रोशीतील अनेक भाविकानी मोठी गर्दी केली होती. विविध खेळण्याची दुकाने, चहापान टपऱ्या, प्रसाद विक्रीची दुकानें यामुळे यात्रा महोत्सवात चांगलीच भर पडली. यात्रा महोत्सवाची सांगता जंगी कुस्त्याने करण्यात आली. यावेळी कुस्त्यासाठी मल्लांची मोठी गर्दी झाली होती. एकंदर ६० मल्लांनी कुस्त्यात भाग घेतला होता.