दौंड रायसिंग हाफ मॅरेथॉन २०२४ स्पर्धचे आयोजन...

दौंड रायसिंग हाफ मॅरेथॉन २०२४  स्पर्धचे आयोजन...

प्रतिनिधी - परशुराम निखळे, दौड

पुणे जिल्ह्यातील दौंड येथे  'दौंड रायसिंग हाफ मॅरेथॉन २०२४' स्पर्धचे आयोजन करण्यात आले. दौंडचे आमदार अँड. राहुल कुल यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅराथॉन ला सुरुवात झाली.

यावेळी सहभागी बालचमूंचा उत्साह वाढविण्यासाठी आमदार अँड. राहुल कुल हे स्वतः मॅरेथॉन मध्ये सहभाग होत ३ किमी धावले.! कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ MIDC आणि ब्लू ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशन दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सुमारे १७०० स्पर्धक सहभागी झाले होते.