माती गोंदते हिरवाई काव्यसंग्रहास पुरस्कार...

माती गोंदते हिरवाई काव्यसंग्रहास पुरस्कार...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण

नाशिक (दिंडोरी) : चिंचखेड येथील कवी विठ्ठलराव संधान यांच्या "माती गोंदते हिर्वाई" या काव्यसंग्रहास स्मिता पाटील "शब्दपेरा"पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण उद्या रविवार दि.१४ जानेवारी रोजी नाशिक येथे होणाऱ्या दोन दिवसीय अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात होणार असल्याचे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी कळविले आहे.

विठ्ठलराव संधान हे शेती मातीमध्ये राबणारी कवी असून, त्यांना शेती करीत असताना आलेल्या समस्या, संकटे यावरच त्यांच्या कविता भाष्य करतात. अनुभवातून आलेली ही कविता वाचकांच्या मनाचा ठाव घेते. कादवा शिवार प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा काव्यसंगह पुरस्काराने सन्मानित होतो आहे. याबद्दल प्रा. डॉ. यशवंतराव पाटील, बाबासाहेब सौदागर, विजयकुमार मिठे, विवेक उगलमुगले, रवींद्र मालुंजकर, बापू चव्हाण, राजेंद्र उगले, तुषार वाघ, डॉ.विलास देशमुख, गोकुळ आव्हाड, राजेंद्र गांगुर्डे, अमोल गणोरे यांनी अभिनंदन केले आहे.