चाकण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक राज्यपालांच्या हस्ते प्रदान..

News15 प्रतिनिधी विश्वनाथ केसवड

चाकण : पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील वाहतूक विभागातील चाकण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना आज मानाचे असे राष्ट्रपती पोलीस पदक महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळखले जाते. अतिशय उत्तम आणि हुशार अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. त्यांनी ज्या विभागात काम केले आहे त्यात उत्कृष्ट काम कसे करता येईल हाच दृष्टिकोन ठेऊन ते आपल्या कामाची छाप पाडत असतात.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुबडे यांना मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातही उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झाले होते. त्याचे आज मुंबईत राज्यपाल तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुबडे यांनी मला जे पदक मिळाले आहे हे पदक माझ्या बरोबर काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य जनतेतील समाज घटक यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे पदक मला मिळाले आहे. तरी मी या सर्वांचा ऋणी आहे तसेच यापुढेही समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे त्यांनी बोलताना सांगितले.