तब्बल २५ ते ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्हास्तरीय स्पर्धेत खेड तालुक्याने पटकावला प्रथम क्रमांक

तब्बल २५ ते ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्हास्तरीय स्पर्धेत खेड तालुक्याने पटकावला प्रथम क्रमांक

प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, खेड

खेड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना ,रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडुस आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद शाळा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत खेड तालुक्याच्य प्रतिनिधित्व करत असताना जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मागच्या वर्षी उपविजेता असलेल्या बारामती तालुक्याचं संघासोबत  या वर्षी खेड तालुक्याचं अंतिम सामना झाला . 

खेड तालुका ( ५३ ) व बारामती ( ० ) असा एकतर्फी विजय मिळवून खेड तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेत १३ तालुक्यांनमधून खेड तालुक्याला पुणे ग्रामीण संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली .त्याबद्दल

सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन  व पुढील स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा 

मार्गदर्शक : संतोष बाप्पू सकोरे, अनिकेत संतोष बवले, विक्रम दिलीप बवले