भैरवनाथ सोसायटीच्या संचालकपदी श्रीमती.उज्वला खराबी यांची बिनविरोध निवड; ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
खराबवाडी : श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, खराबवाडीच्या संचालकपदी श्रीमती उज्वला नंदकुमार खराबी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी, सभासद तसेच ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्यासोबतच शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी काम करण्याची अपेक्षा त्यांच्या निवडीमुळे व्यक्त होत आहे.
सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री. ज्ञानेश्वर शिवराम कड, उपाध्यक्षपदी सौ. संगीता रघुनाथ खराबी, यांच्यासह संचालक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. हनुमंत अनंता कड, श्री. अमृता राजाराम खराबी, श्री. विठ्ठल दत्तात्रय बिरदवडे, श्री. अर्जुन सदाशिव कड, श्री. तानाजी ज्ञानेश्वर खराबी, श्री. मच्छिंद्र जबाजी कड, श्री. राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री. संजय उत्तम कड, श्री. गणेश दिलीप जगताप, श्री. नवनाथ गेणभाऊ कड,श्री. रामचंद्र कोंडिबा खराबी तज्ज्ञ संचालक संस्थेचे सचिव म्हणून श्री. रोहिदास विठ्ठल गव्हाणे काम पाहत आहेत.
उज्वला खराबी यांच्या बिनविरोध निवडीमुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करत पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
vishwanathkeswad