मुख्यमंत्र्यांना भर सभेतन शिवीगाळ अपशब्द.! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला अटक...
![मुख्यमंत्र्यांना भर सभेतन शिवीगाळ अपशब्द.! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला अटक...](https://news15marathi.com/uploads/images/202311/image_750x_6566fdade292a.jpg)
NEWS15 मराठी रिपोर्ट - मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केली आहे. विक्रोळीतील राहत्या घरातून पोलिसांनी दळवी यांना ताब्यात घेतलं आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (शिवसेना) यांच्यात फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष हा दिवसेंदिवस वाढतच आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकेचा भडीमार करीत आहेत. शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी (२७ नोव्हेंबर) भांडुपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहिर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी जोरदार टीका केली होती. यावरून शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
दत्ता दळवी यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं, असा आरोप करत शिंदे गटाने भांडूप पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, शिंदे गटाच्या तक्रारीनंतर भांडूप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भादवी कलम १५३ (अ),१५३ (ब),१५३(अ) (१)सी, २९४, ५०४,५०५ (१) (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दत्ता साळवी यांना अटक होताच ठाकरे गट मात्र आक्रमक झाला असून, ह्याचे पडसाद आणखी तीव्र होण्याचे चिन्ह आहेत.