ताम्हिणी घाटात काळाचा घाला! १२०० फूट खोल दरीत फॉर्च्युनर कोसळली; उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांच निधन...

ताम्हिणी घाटात काळाचा घाला! १२०० फूट खोल दरीत फॉर्च्युनर कोसळली; उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांच निधन...

रायगड | News 15 मराठी प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. तब्बल १२०० फूट खोल दरीत फॉर्च्युनर कार कोसळून बेपत्ता झालेल्या उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृतदेह आढळून आला आहे. मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनच्या आधारे सुरू करण्यात आलेल्या शोधमोहिमेला अखेर यश आले; मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास बेंडखळे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासण्यात आले. या लोकेशनच्या आधारे शोधमोहीम राबवण्यात आली. शोधादरम्यान ताम्हिणी घाटातील खोल दरीत त्यांची फॉर्च्युनर कार आढळून आली.

अत्यंत दुर्गम भागात रेस्क्यू टीमचे आव्हानात्मक बचावकार्य!

सुमारे १२०० फूट खोल दरीत कार आढळल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे मोठे आव्हान रेस्क्यू टीमसमोर होते. SVRSS अर्थात सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमने आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने अत्यंत कठीण परिस्थितीत बचावकार्य राबवले. अथक प्रयत्नांनंतर कारमधून श्रीनिवास बेंडखळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघात कसा घडला, यासह अन्य बाबींचा पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू आहे.