#क्राईम! खेडमध्ये कौटुंबिक वादाचा थरार! पत्नीचा गळा आवळून खून; मुलावरही हल्ल्याचा प्रयत्न..
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,
खेड : शहरातील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन येथे रविवारी सकाळी कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने खेड शहरात खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव दीपा महेंद्र दोंडकर (वय ४०) असून, आरोपी पतीचे नाव महेंद्र शिवाजी दोंडकर (वय ४५) असल्याचे वृत्तात नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. आईला वाचवण्यासाठी आलेल्या १७ वर्षीय मुलावरही आरोपीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि धमकी यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष पवार करीत आहेत.
vishwanathkeswad